Homeसामाजिकनिर्भीड पत्रकारितेची दखल; पत्रकार सुमित सोनवणे यांचा विशेष सन्मान

निर्भीड पत्रकारितेची दखल; पत्रकार सुमित सोनवणे यांचा विशेष सन्मान

✍️ संदिप बारटक्के

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई यांच्या वतीने News18 चे प्रतिनिधी पत्रकार सुमित सोनवणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुणे येथील गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे आणि ‘द वायर’चे पत्रकार मोहम्मद इरफान यांच्या हस्ते पत्रकार सुमित सोनवणे यांना महात्मा फुले यांचे वाङ्मय व पुस्तके प्रदान करण्यात आली. महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा विशेष सन्मान करण्यात आला.

पत्रकार सुमित सोनवणे हे गेल्या दहा वर्षांपासून ग्रामीण तसेच शहरी भागातील विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने पत्रकारिता करत आहेत. शेतकरी, वंचित व दुर्बल घटकांचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या तसेच प्रशासनातील त्रुटी यांना त्यांनी आपल्या वृत्तांकनातून सातत्याने वाचा फोडली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुस्थिती मांडण्याची भूमिका त्यांनी आपल्या पत्रकारितेतून जपली आहे.

सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना माध्यमांमध्ये स्थान मिळवून देणे, प्रशासनाच्या कारभारातील त्रुटी समोर आणणे आणि सामाजिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडणे, या भूमिकेमुळे सोनवणे यांच्या पत्रकारितेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या याच निर्भीड, परखड आणि सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेची दखल घेत संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सन्मान स्वीकारताना पत्रकार सुमित सोनवणे यांनी महात्मा फुले यांचे वाङ्मय आणि पुस्तके मिळणे हा आपल्यासाठी अभिमानाचा तसेच प्रेरणादायी क्षण असल्याची भावना व्यक्त केली. महात्मा फुले यांनी समाजातील विषमता, अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहून केलेले कार्य पत्रकारितेसाठीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना पुढील वाटचालीत सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करण्याची नवी प्रेरणा मिळाली, असे सोनवणे यांनी सांगितले.

दौंडचे सुपुत्र पत्रकार सुमित सोनवणे यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीला वृत्तवेध मarathi कडून मनःपूर्वक शुभेच्छा,,,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!