Homeक्राईमदौंड हादरलं | फसवणुकीच्या जाळ्यात ज्येष्ठाचा बळी; मृत्यूपूर्वी वहीत लिहिली १३ आरोपींची...

दौंड हादरलं | फसवणुकीच्या जाळ्यात ज्येष्ठाचा बळी; मृत्यूपूर्वी वहीत लिहिली १३ आरोपींची नावे

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : दौंड पोलीस स्टेशनमध्ये गु.रजि. नं. 298/2026 अन्वये बी.एन.एस. कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत १३ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत दौंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अव्दैत विवेक गटणे (वय 37, व्यवसाय – खाजगी नोकरी, मूळ रा. महादेव गल्ली, दौंड, हल्ली रा. क्विन्स टाउन, चिंचवड रेल्वे स्टेशन समोर, चिंचवड, पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचे वडील विवेक शंकर गटणे (वय 72) यांना आरोपींनी “फायनान्स कंपनीत ओळखीचे कर्मचारी” असल्याचे सांगून विश्वासात घेतले. मागील एक वर्षाच्या कालावधीत आरोपींनी वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे, सोने व इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र, त्या परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, दिलेले पैसे व वस्तू परत मागितल्यावर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. यामुळे विवेक गटणे यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. या सततच्या त्रासातून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

विशेष म्हणजे, मयत विवेक गटणे यांनी मृत्यूपूर्वी आरोपींची नावे एका वहीत लिहून ठेवल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्या आधारे आरोपी क्र. 1 ते 13 विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये संजय भिमराव बारवकर, अरीफ शमशुद्दीन शेख, प्रकाश आबाजी भालेराव, अख्तर अहमद शेख, आदित्य सुधीर जगताप, शंकर रमेश वाघमारे, नगरसेवक राजू भीमराव बारवकर तसेच शितोळे, सोनवणे, चोप्रा, कुलकर्णी (मॅडम), शिंदे व मुल्ला (मुंबई) यांचा समावेश आहे. काही आरोपींची पूर्ण नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार सय्यद (पो.हवा. 508) यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपेश कदम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!