Homeशहरदौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.... सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

दौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…. सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

✍️ अख्तर काझी

दौंड: जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे समस्त मुस्लिम समाज व शाही आलमगीर मशीदीच्या वतीने जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. परंपरेप्रमाणे जयंती निमित्ताने आयोजकांच्या वतीने जुलुस( मिरवणूक) चे आयोजन करण्यात आले होते. येथील आलमगीर मशीद येथून जुलुसला प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव तसेच बच्चे कंपनी पारंपारिक वेशभुषेत उंट, घोड्यावर स्वार होत जुलूस मध्ये सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत व पैगंबरांच्या जयघोषात जुलुस शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ होत असताना येथील विविध पक्ष, संघटनांच्या वतीने जुलूस चे स्वागत करण्यात आले, मुस्लिम बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जुलूस मध्ये सहभागी मुस्लिम बांधवांना मिठाई ,आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले.

आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे,मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे ,योगेश कटारिया, जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात तसेच नगरसेवक, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शाही आलमगीर मशीद येथे जुलुसची सांगता करण्यात आली. यावेळी मशिदीचे मौलाना अस्लम रझा यांनी मो. पैगंबर यांच्या विचारांना उजाळा दिला, पैगंबर जयंती चे महत्व पटवून दिले. प्रत्येक मुस्लिम बांधवांनी पैगंबरांच्या विचारांचे आचरण करून त्यांची जीवनामध्ये अंमलबजावणी करावी असे आवाहन केले. तसेच आपल्या भारतासह सर्वत्रच शांतता नांदावी, भाईचारा वाढावा अशी अल्लाह कडे प्रार्थना केली.

पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे जयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

error: Content is protected !!