Homeक्राईमदौंड मधील तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रकचा दौंड पोलिसांनी लावला शोध.........

दौंड मधील तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रकचा दौंड पोलिसांनी लावला शोध…… दौंड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी।

✍️ अख्तर काझी

दौंड: शहरातील उड्डाण पुलाजवळ एका दुचाकी ला पाठीमागून येणाऱ्या हायवा ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील तरुणी रस्त्यावर फेकली जाऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

अपघाता नंतर ट्रक चालक जखमी तरुणीला कोणतीही मदत न करता आपल्या वाहनासह तेथून फरार झाला. राजेंद्रनाथ धेंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला .मात्र दौंड पोलिसांनी कसून शोध घेत तीन दिवसातच तो हायवा ट्रक अखेर शोधून आणलाच व चालका विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 7जुलै रोजी सायंकाळी 6 वा. दरम्यान शहरातील उड्डाण पुलाजवळ घडली. सारिका अशोक कंकाळे ही तरुणी आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना येथील उड्डाणपूल परिसरात पाठीमागून आलेल्या हायवा ट्रकने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सारिका रस्त्यावर फेकली गेल्याने तिच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली. अपघातानंतर चालक हायवा ट्रक घेऊन फरार झाला. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या स्थानिकांना सारिका चा मोबाईल सापडला. त्यापैकी एकाने मोबाईल वरून तिच्या घरच्यांना अपघाताची माहिती दिली व सारिका गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. जखमी सारिकाला उपचारासाठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तिच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला पुणे येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. परंतु मृत्यूशी झुंजताना अखेर दिनांक 9 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

सारिकाच्या मृत्यूची बातमी कळताच ,घटनेचे गांभीर्य ओळखून दौंड पोलिसांनी तो हायवा ट्रक शोधण्यासाठी आपल्या तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. या मार्गावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे या मार्गावरून गेलेल्या अनेक वाहनांची माहिती घेतली. पोलिसांनी दोन-तीन दिवस या हायवा ट्रकचा कसून शोध घेतला असता सदरचा ट्रक काष्टी येथील दालमिया सिमेंट प्रोजेक्ट येथील असल्याचे निष्पन्न झाले. अपघातास व तरुणीच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या हायवा ट्रक सह चालकास दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक कृष्णा देवभान रजक(रा. मध्य प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यास अटक करण्यात आली. दौंड पोलिसांनी, सारिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अपघातातील ट्रक शोधल्याने तिच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई मिळण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, पोलीस हवालदार अमीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल पवन माने व गोरख हजारे या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!