Homeक्राईमदौंड पोलीसांची सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई; दोन आरोपी एक वर्षासाठी तडीपार

दौंड पोलीसांची सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई; दोन आरोपी एक वर्षासाठी तडीपार

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दौंड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत दोन सराईत आरोपींना पुढील एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शंकर विटकर (रा. बोरावकेनगर, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे, नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण करणे, दमदाटी करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच मानवी जीवितास धोका निर्माण करणारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सन २०२३ ते २०२५ या कालावधीत दौंड पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.

तसेच असीम कासिम उर्फ असिफ कासम कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे, गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल, गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवणे तसेच नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्धही दौंड पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

दोन्ही आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) व (ब) अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध तडीपार कारवाईचा प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी, दौंड यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर मा. उपविभागीय दंडाधिकारी रेवनाथ लबडे यांनी आरोपी अमोल शंकर विटकर व असीम कासिम उर्फ असिफ कासम कुरेशी यांना पुणे पोलीस आयुक्तालय व महानगरपालिका हद्दीसह पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या हद्दीतून पुढील एक वर्ष कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

पोलीसांनी दोन्ही आरोपींना तडीपार आदेशाची विधिवत बजावणी केली असून संबंधित जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर रवाना करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे दौंड पोलिसांकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!