Homeक्राईमदरोडेखोरांचा मध्यरात्री तांडव; खोरवडी- आलेगाव परिसरातील नागरिकांना बेदम मारहाण करत लाखोंचा ऐवज...

दरोडेखोरांचा मध्यरात्री तांडव; खोरवडी- आलेगाव परिसरातील नागरिकांना बेदम मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड | दौंड तालुक्यातील खोरवडी व आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकत नागरिकांना मारहाण करून सुमारे ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मल्हारी शिंदे (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० जून २०२६ रोजी पहाटे १ ते ३.१० वाजण्याच्या दरम्यान खोरवडी गाव हद्दीतील आवदे वस्ती, बाबीर नगर तसेच आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर घडला.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते सात अज्ञात आरोपींनी चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या व दगड यांसारख्या घातक हत्यारांचा वापर करून नागरिकांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी विविध घरांमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मोटारसायकली असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.

दरोडेखोरांनी अर्चना आवदे, शोभा खोमणे, नकाबाई शिंदे, मुकिंदा चलवादी, मिना कदम, विनय कदम यांच्यासह अन्य नागरिकांच्या घरांमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व दुचाकी वाहने लंपास केली. यामध्ये सुमारे ६८ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, १७ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकलींचा समावेश आहे.

या घटनेमुळे खोरवडी व आलेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!