Homeशिक्षण-प्रशिक्षणचिमुकल्या हातांचे मोठे योगदान; ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श

चिमुकल्या हातांचे मोठे योगदान; ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श

✍️ संदिप बारटक्के

दौंड : विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि संवेदनशीलतेची भावना रुजावी, यासाठी संस्कार प्रायमरी अ‍ॅण्ड हायस्कूलच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘एक मुठ्ठी अनाज’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी संकलित केलेले धान्य सद्गुरू साईबाबा आश्रमशाळा, गिरीम येथे भेट देऊन गरजू विद्यार्थ्यांना धान्यवाटप करण्यात आले.

सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि संवेदनशीलता या मूल्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या मूल्यांचा केवळ पाठ्यपुस्तकातून अभ्यास न करता त्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, या उद्देशाने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमाचा पुढाकार घेतला.

विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून आपल्या परीने धान्य आणून ते संकलित करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात धान्य जमा केले. संकलित करण्यात आलेले धान्य आश्रमशाळेला देण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘आपल्या वाट्याचे थोडेसे योगदानही एखाद्या गरजू व्यक्तीसाठी मोठी मदत ठरू शकते’, हा सामाजिक संदेश प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता आला. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करताना त्यातून मिळणारे समाधान आणि आनंदही विद्यार्थ्यांनी अनुभवला.

शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. पुस्तकातील मूल्यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत संस्कार स्कूलने विद्यार्थ्यांना माणुसकी, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचा धडा दिला. त्यामुळे हा उपक्रम केवळ धान्यवाटपापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग ठरला.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संस्थापक जयंत पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रतिभा अनंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सौ. प्रीती गंगावणे यांनी केली.

विद्यार्थ्यांच्या छोट्याशा योगदानातून मोठ्या सामाजिक जाणिवेचा संदेश देणारा ‘एक मुठ्ठी अनाज’ हा उपक्रम संस्कार स्कूलच्या मूल्याधिष्ठित शिक्षणाची प्रेरणादायी झलक ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये ‘घेण्यापेक्षा देण्यात आनंद आहे’ ही भावना रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!