वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
८ व्या बॅडी स्केटिंग राष्ट्रीयस्तरीय नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा दि. २५ ते २६ एप्रिल दरम्यान गोवा येथील मीरामार युथ हॉस्टेल येथे उत्साहात पार पडल्या. बॅडी स्केटिंग म्हणजेच रशियन हॉकी हा रशियाचा राष्ट्रीय खेळ असून स्केटिंग घालून हॉकी खेळली जाते. हा खेळ प्रामुख्याने बर्फावर खेळला जातो.
या राष्ट्रीय स्पर्धेत दौंड तालुक्यातील ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दमदार सहभाग नोंदवत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. स्पर्धेत उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र अशा विविध राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता.
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण देशात महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले.
राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रशस्तिपत्रक देऊन दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्षा छाया थोरात, गटनेते जीवराज पवार, नगरसेविका स्वाती सावंत, राणी लष्करे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे म्हणाले की, दौंड नगर परिषदेमार्फत क्रीडा विभागाच्या माध्यमातून लहान मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे :
दहा वर्षांखालील मुले
कांस्यपदक (ब्राँझ मेडल)
ऋत्विक कुंभार, राजवीर दळवी, साईराज पाडोळे, रुद्र गोसावी, हर्ष शेंडगे
दहा वर्षांखालील मुली
सुवर्णपदक (गोल्ड मेडल)
मनाली दळवी, श्रद्धा पाडोळे, आरोही चौधरी
१४ वर्षांखालील मुले
कांस्यपदक (ब्राँझ मेडल)
अंश यादव, क्षितिज कुंभार, गंधार नवले, दिव्यांशू जाधव
१७ वर्षांखालील मुली
कांस्यपदक (ब्राँझ मेडल)
प्रणिती दत्तात्रेय दुधाळ
या सर्व खेळाडूंना ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य प्रशिक्षक समाधान दाने सर, गणेश घुगे सर, आकाश कसबे सर, यश बारवकर सर तसेच प्रशिक्षक कांचन नेवसे मॅडम आणि अनुराधा निकम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
तसेच महाराष्ट्राचे सचिव मदन बदर सर, संदीप टेंगले सर, डॉ. लोणकर आणि विजय टिपपूघडे सर यांनीही खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नगरपालिकेच्या वतीने सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























