Homeक्राईमक्षुल्लक वाद रस्त्यावरचा पोहोचला थेट मारहाणीपर्यंत | वकिलावर जीवघेणा हल्ला, बाप- लेकांविरोधात...

क्षुल्लक वाद रस्त्यावरचा पोहोचला थेट मारहाणीपर्यंत | वकिलावर जीवघेणा हल्ला, बाप- लेकांविरोधात गुन्हा दाखल

वृत्तवेध मarathi /संदिप बारटक्के 

दौंड : दौंड तालुक्यातील खोरवडी परिसरात रस्त्यावर गाडीने कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुण वकिलावर लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघा बाप–लेकांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश संतोष काळे (वय २५, व्यवसाय – वकील, रा. आलेगाव काळेवस्ती, ता. दौंड) हे २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून खोरवडी गावच्या हद्दीतील आव्हाळे वस्ती परिसरातून दौंड–सिद्धटेक रस्त्याने जात होते. यावेळी त्यांच्या ओळखीचे नामदेव भिकाजी सुर्यवंशी व त्यांचा मुलगा स्वप्नील नामदेव सुर्यवंशी (दोघे रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) यांनी त्यांच्या दुचाकीने फिर्यादीच्या मोटारसायकलला कट मारला.

कट मारल्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “तुला आज जिवे मारून टाकतो” अशी धमकी देत स्वप्नील सुर्यवंशी याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून फिर्यादीवर हल्ला केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवा. पांढरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवा. म्हेत्रे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!