Homeमहाराष्ट्रआमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने दौंडला मोठा दिलासा | दौंड बसस्थानक होणार...

आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याने दौंडला मोठा दिलासा | दौंड बसस्थानक होणार अद्ययावत; ७ कोटींच्या निधीतून सर्वांगीण विकास

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

पुणे विभागातील दौंड बसस्थानक व आगाराच्या नूतनीकरणासाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन व गृह विभागाने या प्रकल्पासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दौंड शहरातील प्रवासी तसेच एसटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास जाणार आहे.

दौंड बसस्थानकाची दयनीय अवस्था तसेच आगारातील कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्यांकडे आमदार अॅड. राहुल कुल यांनी सातत्याने शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत राज्य शासनाने दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित शासन निर्णय निर्गमित केला आहे.

मंजूर निधीतून दौंड बसस्थानक व आगाराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्यात येणार असून प्रवाशांसाठी आधुनिक आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निधीतून मुख्य आगार इमारतीचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात येणार आहे. चालक-वाहकांसाठी टॉयलेट ब्लॉकसह सुसज्ज विश्रांतीगृह, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह तसेच लाईन चेकिंग पथकासाठी स्वतंत्र खोली उभारण्यात येणार आहे.

तसेच आगार व बसस्थानक परिसरात सुमारे २ कोटी ७७ लाख ३० हजार रुपये खर्चून काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यामुळे चिखल व धुळीचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे. कॅश इशू सेक्शन, लेखा शाखा तसेच आगार व्यवस्थापकांसाठी नवीन निवासस्थान बांधण्यात येणार आहे. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग, अत्याधुनिक फायर फायटिंग यंत्रणा, कुंपण भिंत व नवीन प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात येणार आहे.

सदर काम सुरू करण्यापूर्वी वास्तुविशारदांकडून नकाशा मंजुरी व तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले असून, कामाचा दर्जा राखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आमदार अॅड. राहुल कुल यांनी मिळवून दिलेल्या या भरीव निधीमुळे दौंड परिसरातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!