वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी हेमंत शेंडगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल संविधान हक्क संरक्षण समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. शेंडगे यांना शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या सदिच्छा व्यक्त केल्या. दौंड शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, श्री. शेंडगे यांचा प्रशासकीय अनुभव, कार्यनिष्ठा आणि नेतृत्वगुण यामुळे दौंड शहर पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावेल. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करून पोलीस व जनतेमधील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी संविधान हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख, शाहिद करीम शेख, खलील शेख, माऊली लबडे तसेच समितीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना शुभेच्छा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्यकाळात दौंड शहरात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे प्रभावी पालन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























