Homeराजकीयदौंड नगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिक हित संरक्षण मंडळ व मित्रपक्षांचे धरणे आंदोलन; विविध...

दौंड नगरपालिकेच्या कारभाराविरोधात नागरिक हित संरक्षण मंडळ व मित्रपक्षांचे धरणे आंदोलन; विविध नागरी प्रश्नांवर प्रशासनाला धरले धारेवर

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | शहरातील प्रलंबित नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, आरपीआय (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट) व मित्रपक्ष यांच्या वतीने गटनेते योगेश कटारिया यांच्या नेतृत्वाखाली आज दौंड नगरपालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या कामकाजात होणाऱ्या दिरंगाईबाबत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना जाब विचारण्यात आला.

आंदोलनादरम्यान दौंड शहरातील विविध मूलभूत प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविणे, तसेच पाणीपुरवठा विभागात कामगारांची संख्या वाढवून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करून लाईट विभागात आवश्यक मनुष्यबळ वाढवावे, नगरसेवकांनी दिलेल्या पत्रांवर लेखी उत्तर द्यावे, तसेच मोकाट जनावरे पकडण्याचे टेंडर रद्द केल्याचा विषय आगामी सर्वसाधारण सभेत चर्चेस घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलकांनी सफाई कामगारांनी पूर्ण वेळ ड्युटी बजावावी, नगरपालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी लोकप्रतिनिधींना व नागरिकांना योग्य सहकार्य करीत नसल्याचा आरोप करत त्याबाबत सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच नगरपालिकेतील रिक्त पदे तातडीने भरावीत, लाईट विभागासाठी आवश्यक सर्व साहित्य उपलब्ध करून रखडलेली कामे पूर्ण करावीत, शहरातील बंदिस्त चेंबरची स्वच्छता तातडीने करावी, विविध विकासकामांच्या ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहावेत, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून द्यावेत, अशाही मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून संबंधित विषयांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

धरणे आंदोलनात नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, आरपीआय (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट) व मित्रपक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!