Homeराजकीयदिव्यांगांसाठी स्कुटी अनुदानाची योजना सुरू करा; रमाई आवासचा रखडलेला निधी तातडीने द्या...

दिव्यांगांसाठी स्कुटी अनुदानाची योजना सुरू करा; रमाई आवासचा रखडलेला निधी तातडीने द्या – जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे-पाटील यांना निवेदन

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्कुटी अथवा मोटारसायकल उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी, तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या बांधवांना अनुदानाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे-पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

दौंड शुगर येथे झालेल्या या भेटीदरम्यान दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन प्रवास, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना स्कुटी किंवा मोटारसायकल देण्यासाठी विशेष योजना सुरू करून त्यासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच सध्या असलेल्या निकषांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रमाई आवास योजनेच्या कामांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. निधीअभावी अनेक पात्र लाभार्थ्यांची घरकुलांची कामे रखडली असून, संबंधित कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित घरकुलांना निधी देऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद साळवे, विजय थोरात, शहाजी भदरगे, अशोक कांबळे,सूर्यकांत गायकवाड, रामभाऊ महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड मध्ये भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती निमित्ताने सामाजिक उपक्रमांचे आयोजन….. संत मदर तेरेसा...

  ✍️अख्तर काझी दौंड: भारतरत्न संत मदर तेरेसा यांची 116 वी जयंती शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने शहरातील संत मदर तेरेसा स्मारकास...

दौंड मध्ये प्रेषित मो. पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…. सामाजिक उपक्रमांचे आयोजन।

  ✍️ अख्तर काझी दौंड: जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे समस्त मुस्लिम समाज...

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

error: Content is protected !!