✍️ संदिप बारटक्के
दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका यांच्या वतीने राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, ता. दौंड, जि. पुणे यांना विविध ३१ प्रकारची ३५० झाडांची रोपे भेट देण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात रुजावा तसेच प्रशिक्षण केंद्राचा परिसर अधिक हिरवागार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची दखल घेत प्राचार्य जयश्री देसाई (IPS) यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले.
या उपक्रमासाठी झाडांची रोपे आणण्यासाठी हनुमंत गाडे, डॉ. सुभाष पानसरे, प्रसाद गायकवाड, रमेश गाडे व सचिन वाबळे यांनी विशेष सहभाग घेतला.
यावेळी विक्रम पवार, गणेश काकडे, उमेश वीर, रोहन घोरपडे, विजय जगदाळे व राजू निंबाळकर हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कौतुक करण्यात आले. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























