वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड – नुकत्याच झालेल्या दौंड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले सागर जगताप यांनी निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकप्रिय आमदार राहुल कुल माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया तसेच माजी नगरसेवक अण्णासाहेब जगताप यांचे कार्य तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देत प्रभाग क्रमांक सहा आदर्श बनवण्याचा संकल्प नगरसेवक सागर अण्णासाहेब जगताप यांनी यावेळी जाहीर केले.
जगताप परिवाराचा समृद्ध राजकीय वारसा पुढे चालवत श्री. सागर अण्णासाहेब जगताप यांनी दौंड नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ६ अ मधून १०६ मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.
यापूर्वी त्यांचे वडील अण्णासाहेब जगताप यांनी १९९२साली नगरसेवकपद भूषवले असून, मातोश्री सुनिता अण्णासाहेब जगताप यांनी २००२ साली थेट जनतेतून निवडून येत पाच वर्षे नगराध्यक्षा म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला होता.
मागील १८ वर्षांपासून निर्माण झालेली सक्रिय राजकारणाची पोकळी भरून काढत सागर जगताप यांनी पहिल्याच प्रयत्नात नगरसेवकपद खेचून आणले आहे. सामाजिक कार्याचे फळ म्हणून प्रभाग ६ मधून सागर जगताप यांचा दणदणीत विजय झाला
पुढील पाच वर्षांत आमदार राहुल दादा कूल, आदरणीय प्रेमसूखजी कटारिया व आदरणीय अण्णासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, तसेच सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार नगरसेवक सागर अण्णासाहेब जगताप यांनी व्यक्त केला आहे.
“प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान रुपी आशिर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे,तसेच नव्या जबाबदारीतून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार”.
– सागर अण्णासाहेब जगताप

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























