वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक रुपेश राजेश जाधव यांची हिंदू बेस्तर समाजाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अवघ्या २३ व्या वर्षी हिंदू बेस्तर समाजाने रुपेश जाधव यांच्यावर विश्वास ठेवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वर्गीय नगरसेवक राजेश शामराव जाधव यांच्या निधनानंतर रुपेश जाधव यांची दौंड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली होती. सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून त्यांची शहरात चर्चा झाली होती. त्यानंतर आता हिंदू बेस्तर समाजानेही त्यांच्यावर विश्वास ठेवत अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हाती दिली आहे.
यावेळी बोलताना रुपेश जाधव म्हणाले, “माझ्यावर हिंदू बेस्तर समाजाने जो विश्वास टाकला आहे तो मी निश्चितपणे पूर्ण करेन. माझे वडील दिवंगत नगरसेवक राजेश जाधव यांनी समाजहितासाठी ज्या पद्धतीने कार्य केले, त्याच मार्गावर राहून समाजासाठी काम करत पुढील वाटचाल करेन.”
दरम्यान, हिंदू बेस्तर समाजाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुधीर मधुकर जाधव, सचिवपदी रवींद्र यशवंत जाधव, तर खजिनदारपदी शामराव नागराज जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























