वृत्तवेध मarathi _ संदिप बारटक्के
दौंड विश्वरत्न, महामानव, परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारत भाग्यविधाता, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भीम आर्मी भारत एकता मिशन, दौंड शहर व तालुका यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
दौंड शहराध्यक्ष सुनील पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दौंड येथे नागरिकांसाठी पाणी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भीम जयंतीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















