Homeराजकीयभाजप दौंड शहर पदवाटप सोहळा उत्साहात; नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटन बळकटीची जबाबदारी

भाजप दौंड शहर पदवाटप सोहळा उत्साहात; नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटन बळकटीची जबाबदारी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

भारतीय जनता पक्षाच्या दौंड शहरातील पदवाटप सोहळा आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहराध्यक्ष रितेश ओझा यांनी नविन कार्यकारिणीची घोषणा केली. पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

यावेळी दौंड शहर भाजपच्या उपाध्यक्षपदी राहुल भंडारी, नागेश बेलुरकर, तन्मय पवार आणि प्रकाश पारदासानी यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच भाजप महिला मोर्चा दौंड शहर अध्यक्षपदी मोनाली प्रमोद वीर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सरिता गौरव कुल, सीमा राहुल शेंडे आणि रिया मनोज रामदासानी यांची निवड करण्यात आली.

याचबरोबर भाजप युवा मोर्चा दौंड शहर अध्यक्षपदी यश किरण कुलथे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व गटनेते योगेश कटारिया, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ठोंबरे काका तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी “आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः” हा विचार अंगीकारून संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण, सक्षमीकरण आणि विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनी आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष रितेश ओझा यांच्या नेतृत्वात दौंड शहरातील भाजप संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!