Homeशहरदौंडमधील राष्ट्रसंत गाडगेबाबा स्तंभाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा; आमदार राहुल कुल यांचे काम...

दौंडमधील राष्ट्रसंत गाडगेबाबा स्तंभाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा; आमदार राहुल कुल यांचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन |

✍️ संदिप बारटक्के

दौंड : शहरातील राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्तंभाच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली. यावेळी स्तंभाच्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले.

दौंड शहरातील राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकातील हा स्तंभ दौंड परीट (धोबी) समाजासाठी श्रद्धेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. गेल्या सुमारे ५० वर्षांपासून या स्मारकाशी समाजबांधवांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती, पुण्यतिथी तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या स्तंभाच्या नूतनीकरणासाठी दि. १४ मार्च २०२४ रोजी आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) उपलब्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, नूतनीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही.

याच पार्श्वभूमीवर दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार ॲड.राहुल कुल यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे स्तंभाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच, सध्या स्तंभ ज्या ठिकाणी आहे, त्याच जागेवर त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

राष्ट्रसंत गाडगेबाबांनी स्वच्छता, समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या स्तंभाचे नूतनीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यालाही नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली.

आमदार राहुल कुल यांनी स्तंभाच्या कामासंदर्भात सकारात्मक भूमिका घेत लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने दौंड परीट (धोबी) समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता मंजूर निधीतून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन स्तंभाचे नूतनीकरण लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!