Homeक्राईमदौंड शहरातील मोकाट जनावरे पकडणाऱ्या नगरपालिकेच्या ठेकेदाराने तब्बल 53 जनावरांचा केला अपहार.........

दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडणाऱ्या नगरपालिकेच्या ठेकेदाराने तब्बल 53 जनावरांचा केला अपहार…… किरण डिस्ट्रीब्युटर्स विरोधात गुन्हा दाखल।

✍️अख्तर काझी

दौंड : शहरातील मोकाट फिरणारी जनावरे( गाय ,बैल) पकडून निश्चित केलेल्या गोशाळेत जमा करण्याबाबतच्या कामाचा ठेका दौंड नगरपालिकेने किरण डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीला दिलेला होता. या ठेकेदाराने दिनांक 9 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत शहरातील 53 जनावरे पकडून ती गोशाळेत जमा न करता त्यांचा अपहर केला असल्याबाबतची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी फिर्याद दिली, दौंड पोलिसांनी किरण डिस्ट्रीब्युटर्स, प्रो. प्रा. किरण नितीन वांभिरे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याबाबतची माहिती ठाणे अंमलदार बी. एन. रोटे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड नगरपालिकेकडून, शहरात फिरणारी मोकाट जनावरे पकडून मान्यताप्राप्त गोशाळेत जमा करण्याबाबत च्या कामाचा ठेका किरण डिस्ट्रीब्युटर्स कंपनीला(दि.29/9/2025) देण्यात आला होता. त्या अनुषंगाने ठेकेदाराने शहरातील मोकाट फिरणारे जनावरे पकडून गोशाळेत जमा करण्याचे कामास सुरुवात केली होती. ठेकेदाराने दिनांक 14 ऑक्टोबर 2025 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये एकूण 174 जनावरे( गाय ,बैल) पकडून श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट बोरीपारधी, चौफुला,ता. दौंड व शिवशंभो शाळा ट्रस्ट ,पुणे येथे जमा केली. त्याबाबतचे आवश्यक ते दाखले जोडून त्याप्रमाणे नगरपालिकेकडे बिले सादर केली. कागदपत्रांची पडताळणी करून नगरपालिकेने ठेकेदारास बिलांची रक्कम अदा केली.

त्यानंतर मी किरण डिस्ट्रीब्युटर्स( किरण नितीन वांभिरे) यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये शहरातील एकूण 53 जनावरे पकडून ते सुरक्षित रित्या गोशाळेत जमा करण्यात आले असल्याबाबतचे जिओ टॅगिंग चे फोटो सोबत असणारे बिल( रक्कम रु.3 लाख 71 हजार) नगरपालिकेकडे 16 फेब्रुवारी रोजी सादर केले होते. त्यानुसार सदर बिल मंजूर करण्यासाठी, जनावरे ज्या गोशाळेत दाखल केले त्याची पडताळणी करण्यासाठी ज्या गोशाळेत जनावरे जमा करण्यात आली आहेत त्या गोशाळेचा दाखला ठेकेदाराकडे मागितला असता त्यांनी तो दाखला सादर केला नाही. त्यामुळे नगरपालिकेने नोटीसीद्वारे ठेकेदाराकडे सदर कालावधीमध्ये गो शाळेत जमा केलेल्या जनावरांचा दाखला व इतर कागदपत्रांची मागणी केली. परंतु ठेकेदाराने सदर नोटीस ला असमाधानकारक उत्तर देऊन अद्याप पर्यंत जनावरे जमा केलेला दाखला नगरपालिकेकडे सादर केलेला नाही. त्यामुळे या ठेकेदाराने जनावरे गोशाळेत जमा केले अगर कसे याबाबत नगरपालिकेला शंका निर्माण झालेली आहे.

ठेकेदार किरण डिस्ट्रीब्युटर्स यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये एकूण 53 गाय ,बैल जनावरे पकडून ते सुरक्षितरीत्या गोशाळेत जमा न करता त्यांच्याकडे दिलेले कंत्राट व त्यापोटी त्यांचेवर सोपविण्यात आलेला जनावरांचा कायदेशीर ताब्याचा गैरफायदा घेऊन ठेकेदाराने या 53 जनावरांचा गैर कायदेशीरपणे अपहार केला आहे अशी माहिती फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!