Homeशहरदौंड मध्ये नवयुग गणेश मंदिरात अथर्वशीर्ष पठणाचा भक्तिमय सोहळा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

दौंड मध्ये नवयुग गणेश मंदिरात अथर्वशीर्ष पठणाचा भक्तिमय सोहळा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

✍️संदिप बारटक्के

दौंड : दौंड–सिद्धटेक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नवयुग श्री गणेश मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

नवयुग गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. कार्यक्रमासाठी महिलांची विशेष उपस्थिती राहावी, यासाठी मंडळाच्या वतीने ये-जा करण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच मंडळाच्या वतीने सर्वांसाठी प्रसाद व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाची संकल्पना नवयुग गणेश मंदिराचे कार्यकर्ते राहुल भालेराव यांची होती. अथर्वशीर्ष पठणाच्या आयोजनासाठी मनीषा सोनटक्के, नम्रता नाडगौडा व मंगेश वैद्य यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुग श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या महिला सदस्या दीपा भालेराव, रूपाली खादगे, मानसी वैद्य, साधना बलदोटा, सविता अग्रवाल व सौ. ठोंबरे यांनी शिस्तबद्ध नियोजन केले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

नवयुग श्री गणेश मंदिर ट्रस्ट चे प्रमुख सदस्य आनंद बलदोटा, प्रशांत खादगे, सुरेंद्र बलदोटा, वैभव टाटीया, मनोज अग्रवाल, सचिन गोलांडे व राजेश बलदोटा यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष व्यवस्थेपर्यंत परिश्रम घेतले.

या भक्तिमय कार्यक्रमाला नवयुग गणेश मंदिराचे मुख्य विश्वस्त तथा माजी नगरसेवक मोहन नारंग यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुदाम नारंग, नगरसेविका रुचिता कटारिया, माजी नगरसेविका अरुणा डहाळे आणि हरिभाऊ ठोंबरे यांनी आवर्जून भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

नवयुग गणेश मंदिराच्या वतीने दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यंदाच्या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमालाही महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मंडळाच्या उपक्रमशीलतेचे दौंडकरांकडून कौतुक करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!