Homeराजकीयदौंड नगरपरिषदेत गट विकास आघाडीला नवे नेतृत्व; कटारिया गटनेते

दौंड नगरपरिषदेत गट विकास आघाडीला नवे नेतृत्व; कटारिया गटनेते

वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के

दौंड नगरपरिषदेतील नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले साहेब), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे साहेब) यांच्या विकास आघाडीच्या गटनेतेपदी योगेश कटारिया यांची तर उपगटनेतेपदी शहानवाज पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे दौंड नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून विकासकेंद्रित राजकारणाला बळ मिळाले आहे.

नुकत्याच झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने योगेश कटारिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या अनुभव, संघटन कौशल्य, अभ्यासपूर्ण भूमिका व लोकहिताच्या प्रश्नांवरील ठाम भूमिकेवर विश्वास ठेवून ही जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

योगेश कटारिया हे सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नांमध्ये सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. नगरपरिषदेत त्यांनी यापूर्वीही विविध विषयांवर प्रभावीपणे मते मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गट विकास आघाडी अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर श्री. कटारिया यांनी आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, आमदार राहुल कुल व ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली “दौंड शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या विषयांना प्राधान्य देऊन काम केले जाईल. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे कार्य करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.”

त्यांच्या निवडीबद्दल दौंड शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत सकारात्मक आणि विकासाभिमुख निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

योगेश कटारिया यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे दौंड नगरपरिषदेच्या कामकाजात अधिक समन्वय, गतिमानता व लोकहिताचा दृष्टिकोन दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!