Homeशहरअभिषेक, कीर्तन अन् पालखी सोहळ्याने दौंड नगरी भक्तिरसात; श्री संत सेना महाराज...

अभिषेक, कीर्तन अन् पालखी सोहळ्याने दौंड नगरी भक्तिरसात; श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा दौंड शहरातील श्री विठ्ठल मंदिर येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संघटनेचे अध्यक्ष भगवान बंड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास नाभिक समाजबांधवांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्री विठ्ठल मंदिरात श्री. निरंजन पंडित यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे व विठ्ठल-रुक्मिणीचे विधिवत अभिषेक करून करण्यात आली. यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. भागवताचार्य यतिराज महाराज लोहोर (आळंदी देवाची) यांचे संत सेना महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भक्तिमय कीर्तन झाले. त्यांच्या रसाळ वाणीतून संत सेना महाराजांचा त्याग, भक्ती, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश उपस्थित भाविकांपर्यंत पोहोचला.

कीर्तनानंतर श्री संत सेना महाराजांच्या पालखीची मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी ‘संत सेना महाराजांचा जयजयकार’ आणि विठ्ठल नामाचा गजर करण्यात आल्याने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. सोहळ्यानिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या धार्मिक सोहळ्याला समस्त भजनी मंडळ, दौंड यांचे विशेष सहकार्य लाभले. संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त दौंड शहरातील नाभिक समाजबांधव तसेच सर्व सलून व्यावसायिक, धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून संत सेना महाराजांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दौंड शहरातील नाभिक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून सोहळ्यात सहभाग घेतला. त्यामुळे समाजबांधवांमध्ये एकजूट आणि संत सेना महाराजांविषयीची श्रद्धा दिसून आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष भगवान आप्पा बंड, उपाध्यक्ष गोरख साळुंके, सचिव रविंद्र बंड, सहसचिव ह.भ.प. गजानन जाधव यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!