Homeक्राईमDaund | सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप; पोलिसांकडे कारवाईची मागणी

Daund | सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप; पोलिसांकडे कारवाईची मागणी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात वाढत असलेल्या काही गैरप्रकारांमुळे स्थानिक नागरिक, महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या प्रमाणात महिला, मुली, विद्यार्थीनी तसेच ज्येष्ठ नागरिकांची भाजी मंडई व इतर कामांसाठी ये-जा असते. मात्र काही टवाळखोर व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करून थांबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिलांकडे व मुलींकडे पाहणे, टिप्पणी करणे, अश्लील हावभाव करणे, मोठमोठ्याने आरडाओरडा करणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणारे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे महिला व मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच परिसरात अवैधरित्या मटका जुगार तसेच ऑनलाईन चक्री गेमच्या माध्यमातून जुगार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकारांमुळे परिसरात संशयित व्यक्तींची वर्दळ वाढल्याचे सांगितले जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, परिसरातील एका बिअर शॉपीबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित दुकान निर्धारित वेळेपेक्षा उशिरापर्यंत, रात्री उशिरा सुरू राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यधुंद व्यक्तींची गर्दी वाढून गोंधळ, शिवीगाळ, मोठमोठ्याने बोलणे, वाहनांचा आवाज आदी प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचा त्रास परिसरातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर संबंधित भागात नियमित पोलीस गस्त वाढविणे, महिलांची छेडछाड करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, अवैध मटका व ऑनलाईन जुगाराविरोधात विशेष मोहीम राबविणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

सरपंच वस्ती परिसरातील नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे स्थानिक रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!