_ संदिप बारटक्के
दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी… उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दररोज सुरू राहणार आहे. त्यामुळे विवाह नोंदणीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय कमी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी केंद्रातील गैरसोयी दूर करण्यात यावे या मागणीचे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन गुजर यांना दिले होते. स्वाती सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आज यश आले आहे. रुग्णालय प्रशासनाने बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि टोकन पद्धतीसह विविध सुविधांबाबत कार्यवाही केली आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, विवाह नोंदणीचे कामकाज कार्यालयीन दिवशी सुरू राहणार असल्याने दौंडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी केंद्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने विविध उपाययोजना केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी दिली.
दौंड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी केंद्रात नागरिकांसाठी सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काची माहिती देणारा फलक केंद्राबाहेर लावण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विवाह नोंदणीच्या कामाचा निपटारा जलद गतीने व्हावा, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र व प्राधान्य रांग सुरू करण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे शहरातील नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या प्रयत्नामुळे विवाह नोंदणी कक्षातील अडचणी दूर झाल्या आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















