Homeशहर“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे तुकाई मातेला साकडे |

✍️ संदिप बारटक्के

दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना, दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांनी महिला भगिनींसमवेत दौंडची ग्रामदेवी तुकाई माता मंदिरात जाऊन पावसासाठी साकडे घातले. “पाझर फुटू दे आई तुकाई”! अन्नदाता बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर, राज्यात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडू दे आणि दौंडसह संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् कर, असे साकडे आई तुकाईला घालण्यात आले.

पावसाअभावी शेती आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या संकटाची जाणीव ठेवून, शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धारही नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत महिला भगिनींच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ते सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे म्हणाल्या, “सध्या पावसाअभावी शेतकरी बांधव आणि नागरिक चिंतेत आहेत. आई तुकाई मातेने लवकरात लवकर पाऊस पाडून बळीराजावरील संकट दूर करावे, हीच आमची मनापासून प्रार्थना आहे. या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याच भावनेतून महिला भगिनींच्या माध्यमातून मदतीसाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

दौंड शहरातील पाण्याच्या प्रश्नाबाबतही आपण संवेदनशील असून, दौंड च्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा आणि पाणीपुरवठ्यासंदर्भात योग्य उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी दौंड नगर परिषद प्रयत्नशील राहील, असेही नगराध्यक्षा जगदाळे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधवांना मानसिक आधार देण्यासोबतच सामाजिक सहकार्याचा संदेश देण्यात आला. पावसासाठी तुकाई मातेला घातले साकडे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा दुर्गादेवी जगदाळे यांनी निर्धार व्यक्त केला.

यावेळी नगरसेविका उज्ज्वला परकाळे, नगरसेविका प्रणिता शिंदे- जठार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!