✍️संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरातील नेहरू चौक येथील श्री दुर्गा माता नवरात्र महोत्सव मंडळाच्या २०२६ सालच्या अध्यक्षपदी रितिक राजेंद्र बोराडे यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मंडळाच्या उपाध्यक्षपदी कार्तिक खंडाळे व राजेश मोरे, कार्याध्यक्षपदी रितेश पुजारी, खजिनदारपदी श्रेयस कदम, तर व्यवस्थापकपदी ओम येवले व सार्थक बोराडे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी रितिक लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जोपासण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष रितिक बोराडे यांनी सांगितले. मंडळाच्या वतीने यंदाही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, विविध धार्मिक कार्यक्रम तसेच लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच नागरिकांमध्ये सामाजिक आणि धार्मिक सलोखा निर्माण व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बोराडे यांनी स्पष्ट केले.
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देत नागरिकांच्या सहभागातून उत्सव साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे. आगामी काळातही गरजू नागरिकांना मदत, आरोग्यविषयक जनजागृती आणि युवक व बालकांसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड शहर अध्यक्ष संदिप बोराडे यांनी तसेच परिसरातील नागरिक आणि नवरात्रोत्सवप्रेमींकडून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















