Homeशिक्षण-प्रशिक्षणपुणे जिल्हा ग्रामीण शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी जालिंदर आवारी; कार्याध्यक्षपदी...

पुणे जिल्हा ग्रामीण शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी जालिंदर आवारी; कार्याध्यक्षपदी नितीन वरकड, सचिवपदी अशोक देवकर

✍️- संदिप बारटक्के

पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाची सर्वसाधारण सभा व त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, येरवडा, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी पुणे जिल्हा (ग्रामीण) महासंघाची नूतन कार्यकारिणी एकमताने व बिनविरोध निवडण्यात आली. महासंघाच्या अध्यक्षपदी दौंडचे जालिंदर आवारी, कार्याध्यक्षपदी खेडचे नितीन वरकड, तर सचिवपदी बारामतीचे अशोक देवकर यांची निवड झाली.

निवडणूक निरीक्षक म्हणून माजी प्राचार्य सुनील शिवले व प्रा. संजय कांबळे यांनी काम पाहिले. सभेचे अध्यक्षपद गणेश राऊत यांनी भूषविले. यावेळी राज्यसचिव विश्वनाथ पाटोळे, जिल्हा सचिव रामदास रेटवडे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र खोमणे, प्राचार्य शरद झोळ, प्राचार्या संगीता शिर्के यांच्यासह पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्षपदी शरद झोळ (इंदापूर), उपाध्यक्षपदी शशिकांत शिर्के (भोर), शरद दुर्गे (शिरूर), प्रल्हाद कारकर (पुरंदर), महादेव माळी (मावळ) तसेच महिला प्रतिनिधी संगीता शिर्के (हवेली) यांची निवड करण्यात आली.

उपकार्याध्यक्षपदी सुरेश खाटपे (वेल्हा) व गोरक्षनाथ अधिकारी (भोर), कार्यालयीन सचिवपदी उत्तम जावळे (दौंड), सहसचिवपदी सदाशिव सावंत (इंदापूर), रोहिदास भाडळे (हवेली), संतोष सैद (आंबेगाव), सोमनाथ उबाळे (पुरंदर), राहुल नवले (जुन्नर) व गोरख काकडे (मावळ) यांची निवड झाली. किरण झुरंगे (शिरूर) यांच्यावर खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

संघटक म्हणून तान्हाजी पाटील (हवेली), संभाजी काळे (खेड), संतोष बनकर (मुळशी), मयूर बोंबले (जुन्नर) व राजेंद्र पोमणे (बारामती) यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल चंद (हवेली), प्रवीण होले (दौंड), बाळासाहेब गायकर (मुळशी), मनोज धिवार (शिरूर), देवा मटाले (आंबेगाव), दादा मोरे (इंदापूर) व अमित झरेकर (जुन्नर) यांची निवड करण्यात आली.

महिला प्रतिनिधी म्हणून शुद्धमती पवार (खेड), नंदा सातपुते (शिरूर) व वर्षा गुट्टे (खेड) यांची निवड झाली. राज्य/विभाग प्रतिनिधी म्हणून गणेश राऊत (जुन्नर), रामदास रेटवडे (खेड), राजेंद्र खोमणे (बारामती) व दुर्योधन जठार (दौंड) यांची निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः शालेय क्रीडा स्पर्धांदरम्यान शिक्षक व खेळाडूंना येणाऱ्या अडचणी दूर करणे, खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षक भरतीसाठी पाठपुरावा करणे, अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धती महाराष्ट्रभर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच प्राथमिक स्तरापासून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रभावी शारीरिक शिक्षण मिळावे, यासाठी महासंघ काम करणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्राला सातत्याने दिशा देणारा जिल्हा आहे. नूतन कार्यकारिणीही हीच परंपरा पुढे नेत शारीरिक शिक्षण विषयाला अधिक व्यापक व वैभवशाली स्थान मिळवून देईल, असा विश्वास राज्यसचिव श्री. विश्वनाथ पाटोळे व राज्याध्यक्ष राजेंद्रजी कोतकर सर यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य उत्तम जावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या सौ. संगीता शिर्के यांनी मानले. नूतन कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीबद्दल पुणे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांकडून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!