संदिप बारटक्के
दौंड : भारतीय जनता पार्टी दौंड शहराच्या वतीने आयोजित NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया आणि शहराध्यक्ष रितेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दौंड शहरातील विविध भागांतून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोंदणी केली. माता-भगिनींचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
नोंदणी केलेल्या नागरिकांना अंदाजे एक महिन्यानंतर NCMC कार्डचे वितरण करण्यात येणार असून, याबाबतची माहिती SMS द्वारे देण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल भंडारी, नागेश बेलुरकर, प्रकाश पारदासनी, तन्मय पवार, यश कुलथे, शौर्य पाटील, मोनाली प्रमोद वीर,सीमा शेंडे,सरीता कुल,रिया रामदास यांच्यासह जेष्ठ कार्यकर्ते बालाप्रसाद मंत्री व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























