Homeमहत्त्वाचेदौंड – पुणे लोकल सेवेबाबत केंद्र सरकार सकारात्मक; रेल्वेमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमदार ॲड....

दौंड – पुणे लोकल सेवेबाबत केंद्र सरकार सकारात्मक; रेल्वेमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमदार ॲड. राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

✍️ अख्तर काझी

दौंड – पुणे लोहमार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांच्या सोयीसाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळताना दिसत आहे. या मार्गावर ईएमयू (EMU) लोकल ट्रेन सुरू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट अत्यंत सकारात्मक ठरली असून, रेल्वेमंत्र्यांनी ईएमयू लोकल सेवेचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.

यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे देखील विशेष उपस्थित होते.
दौंड–पुणे रेल्वे कॉरिडॉरच्या समस्यांबाबत आमदार ॲड. राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास सर्व बाबी आणून दिल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून या मागण्या प्राधान्याने सोडवण्याची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे.

यावेळी आमदार ॲड. कुल यांनी सध्या धावणाऱ्या जुन्या DEMU / MEMU गाड्यांऐवजी वेगवान ईएमयू लोकल सेवा तातडीने सुरू करावी, ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि महिला, दिव्यांग तसेच फर्स्ट क्लाससाठी स्वतंत्र डबे उपलब्ध होतील. गाड्यांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी त्वरित दुरुस्ती व अद्ययावत यंत्रणा उभी करावी, सकाळी ६:०० वाजता दौंडवरून सुटणारी DEMU गाडी हडपसरऐवजी थेट पुणे जंक्शनपर्यंत नेण्यात यावी, सकाळ – संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे आणि सकाळी ८:२० ते दुपारी ५:०० या वेळेत नवीन गाड्या सुरू करण्यात याव्यात, दौंड येथील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम जलद गतीने पूर्ण करणे. आदी मागण्या केलेल्या आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत दौंड–पुणे मार्गावरील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, या मार्गावर ईएमयू (EMU) लोकल सुरू करण्याबाबतची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

“दौंड – पुणे रेल्वे कॉरिडॉर हा या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा कणा आहे. प्रवाशांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे लवकरच दौंडकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होईल.”
— ॲड. राहुल कुल, आमदार (दौंड विधानसभा)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!