Homeसामाजिकदौंडमध्ये लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; समाजभूषण पुरस्कार वितरण व प्रबोधन...

दौंडमध्ये लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; समाजभूषण पुरस्कार वितरण व प्रबोधन गीतांनी भारावले दौंडकर

✍️ संदिप बारटक्के

दौंड : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात सकल हिंदू मातंग समाज व लहुजी यंग ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. जयंती उत्सवात दौंडकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी दौंड शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी प्रवीण परदेशी, सतीश थोरात, निखिल स्वामी, संदिप बारटक्के, शीतल मंडावले, गौरव कुल, जितू मगर, डॉ. रोहन खवटे, डॉ. समीर कुलकर्णी, शुभांगी धायगुडे, तात्या काळे, जयदीप बगाडे तसेच स्व. राजेश अण्णा जाधव (मरणोत्तर) यांना हा पुरस्कार आमदार ॲड. राहुल कुल व शिवस्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

लहुजी वस्ताद साळवे चौक येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे लाडके गायक अजय क्षीरसागर यांनी सादर केलेल्या प्रबोधनपर गीतांनी उपस्थितांना सामाजिक एकात्मता, समता आणि परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या दमदार सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिमझिम पडणाऱ्या पावसाची पर्वा न करता ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविल्याने संपूर्ण परिसर उत्साह, सामाजिक ऐक्य आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी चिंब भिजून निघाला होता.

या कार्यक्रमास पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय नेते विष्णूभाऊ कसबे, लहू वंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद भिसे, सोनू अण्णा सोनवणे फाउंडेशनचे अध्यक्ष सोनू सोनवणे, नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, सचिन कुलथे, पत्रकार मनोहर बोडखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश तुपसौंदर्य, उपाध्यक्ष आकाश पवार, कार्याध्यक्ष सूरज दिवटे, बाळू तुपसौंदर्य, सिद्धेश कदम, ओमकार घोलप, सुरज खुडे आणि अविनाश साबळे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नितीन तुपसौंदर्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या जयंती उत्सवासाठी सकल हिंदू मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!