Homeसामाजिकक्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने क्लब ऑफिसर्स प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने क्लब ऑफिसर्स प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

✍️ अख्तर काझी

बारामती : क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने विमाननगर, पुणे येथे क्लब ऑफिसर्ससाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास करणे, सायबर जनजागृतीस चालना देणे, संघटनात्मक कौशल्ये वृद्धिंगत करणे तसेच क्लबच्या प्रभावी कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

सदर उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यासोबतच सायबर सुरक्षेबाबत समाजात जनजागृती करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सखोल जागरूकता निर्माण करणे तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी सायबर सुरक्षेबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ‘कमवा आणि शिका’ या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यही दिले जाणार आहे. हा उपक्रम क्विक हिल फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षण सत्रादरम्यान क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, अजय शिर्के, गायत्री केसकर आणि दीपू सिंग यांनी उपस्थितांना नेतृत्व विकास, प्रभावी संवाद कौशल्य, टीमवर्क, क्लब व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रमांचे नियोजन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. तसेच आगामी शैक्षणिक वर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा मनापासून लाभ घेतला.

या प्रशिक्षणामुळे पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्व व व्यवस्थापन क्षमतांना चालना मिळाली असून, भविष्यातील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सदर प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. अविनाश जगताप, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणास तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. सलमा शेख तसेच क्लबचे अध्यक्ष वरद साळवे, सचिव ज्योती गुरव, अ‍ॅक्टिव्हिटी डायरेक्टर रोहन लोखंडे, मीडिया डायरेक्टर प्रणव भोसले यांनी सहभाग नोंदवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!