डॉ. अतुल चौरे : विशेष प्रतिनिधी
एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावर्षीच्या “निसर्गाकडून प्रेरणा हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी वृक्षारोपण” या संकल्पनेला अनुसरून विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एकनाथ मुंढे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास कांबळे तसेच प्राणीशास्त्र विभागप्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सोपान आयनर यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) दिनकर मुरकुटे, प्रा. फुलचंद कांबळे, प्रा. मोईन तांबोळी, प्राध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























