वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड नगरपरिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संरक्षण, हरित क्षेत्रात वाढ आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष छाया दीपक थोरात, आरोग्य सभापती कार्तिकी सोनवणे, नगरसेविका स्वाती सावंत, प्रणिता शिंदे,राणी लष्करे, उज्वला परकाळे, नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, मुकेश जगताप तसेच नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित शहर उभारणीचा सामूहिक संकल्प करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे जतन व संगोपन करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दौंड शहराच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ झाली असून हरित दौंडच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























