वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : शहरातील गोवागल्ली परिसरात रविवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली असून, युवकावर कु-हाडीने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी शाम जाधव (वय ३०, रा. गोवागल्ली,दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या मावशी यलोबाई व भाऊ राहुल कुमार गायकवाड यांच्यासोबत घरासमोर खुर्ची टाकून गप्पा मारत बसल्या होत्या.
त्यावेळी आरोपी शाहिद मेहमूद शेख (रा. भिमनगर, दौंड) हा पाठीमागून आला व राहुल गायकवाड यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर कु-हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात राहुल गायकवाड गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २७८/२०२६ अन्वये BNS कलम 109(1), 351(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत असून, दाखल अंमलदार पो.स.ई. सुनिल उगले आहेत. पोलिसांनी आरोपी शाहिद मेहमूद शेख यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























