Homeसामाजिकचैत्र पौर्णिमेला श्री दत्तपीठ मंदिरात भक्तीचा जल्लोष; हनुमान जयंती व छत्रपती शिवाजी...

चैत्र पौर्णिमेला श्री दत्तपीठ मंदिरात भक्तीचा जल्लोष; हनुमान जयंती व छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने साजरी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : चैत्र पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर श्री दत्त पीठ दत्त मंदिर येथे धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री हनुमान जयंती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी मोठ्या श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री हनुमानाच्या पूजनाने झाली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित भक्तांनी “जय हनुमान” व “जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी श्री दत्तगुरु व स्वामी समर्थ महाराजांची आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. ही आरती श्री व सौ. वैष्णवी आरती सुळ, श्री व सौ. आरती दिनेश नांदे तसेच श्री व सौ. संध्या सचिन फराटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. त्यांच्या हस्ते झालेल्या आरतीमुळे कार्यक्रमाला विशेष भक्तिमय रंग चढला होता.

कार्यक्रमानंतर या सर्व मान्यवरांचा श्री दत्त पीठ दत्त मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला. मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री बुवा सावंत, विलास बर्वे, नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत, नरेंद्र सावंत आणि निखिल सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद पंगतीचे आयोजन करण्यात आले. श्री व सौ. वैष्णवी आरती सुळ यांनी महाप्रसादाचे आयोजन करून सर्वांना प्रसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश सावंत, एकनाथ कोरडे, नितीन राऊत, राहुल हजारे, राकेश भोसले आदींनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडून शेवटी मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!