Homeताज्या बातम्यारेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार | जिन्यापासून लांब गाडी; रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड

रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार | जिन्यापासून लांब गाडी; रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड

वृत्तवेध मarathi — संदिप बारटक्के 

दौंड : दौंड स्थानकावरून सुटणारी हुतात्मा एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12158) ही गाडी रेल्वे जिन्यापासून बऱ्याच पुढे उभी केली जात असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दररोज सकाळी दौंडहून – पुण्याकडे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना याचा फटका बसत असून, विशेषतः वयोवृद्ध नागरिक, रुग्ण आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिन्यापासून लांब उभ्या असणाऱ्या रेल्वेपयर्यंत प्रवाशांना लांब अंतर चालत जावे लागत असल्याने गैरसोय वाढली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाया जातो आणि सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो आहे.

दौंड–पुणे–दौंड प्रवासी संघाने या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. गाडी योग्य ठिकाणी थांबवावी किंवा पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सोयीपेक्षा प्रशासनाची बेफिकिरीच अधिक दिसून येत असल्याने हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवाशांकडून आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!