Homeसामाजिकस्वामीभक्तांची प्रतीक्षा संपली | 'या' नगरसेविकेच्या पाठपुराव्याला यश; दौंड ते अक्कलकोट एसटी...

स्वामीभक्तांची प्रतीक्षा संपली | ‘या’ नगरसेविकेच्या पाठपुराव्याला यश; दौंड ते अक्कलकोट एसटी धावली

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड — दौंड ते अक्कलकोट मंदिर दरम्यान एसटी बस सेवेचा आज शुभारंभ करण्यात आला असून स्वामीभक्तांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि सोयीची सेवा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून रविवार (ता.२४) पासून ही बस सेवा नियमित सुरू करण्यात आली आहे.

आज पहिल्या बसचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी दौंड नगरपरिषदेचे गटनेते जीवराज पवार, नगरसेविका राणी लष्करे, प्रणिता शिंदे जठार, माजी नगरसेवक दत्तात्रय सावंत, उत्तम सोनवणे, सुहास वाघमारे, दीपक सोनवणे, स्वामीभक्त नागेश साळुंखे, साठे काका, मानवेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वामीभक्तांच्या वतीने नगरसेविका स्वाती सावंत तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना स्वाती सावंत म्हणाल्या, “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,” या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वचनामुळे अनेक भक्तांना संकटाच्या आणि नैराश्याच्या काळात मानसिक आधार मिळतो. अनपेक्षित अडचणींमध्ये मार्ग निघाल्याची अनेक उदाहरणे स्वामींच्या नामस्मरणातून दिसून येतात.

त्या पुढे म्हणाल्या की, स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि स्वामीभक्तांची प्रबळ इच्छा यामुळेच दौंड ते अक्कलकोट ही एसटी बस सेवा सुरू होऊ शकली. “ही स्वामी सेवा माझ्या हातून घडली, हे मी माझे भाग्य समजते,” असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमासाठी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे तसेच चालक सचिन क्षीरसागर, वाहक दिनेश कदम आणि वाहतूक अधिकारी शैलेश मोरे, दत्तात्रय तिगोटे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी, या बस सेवेद्वारे प्रवास करणाऱ्या सर्व स्वामीभक्तांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या नव्या बस सेवेच्या सुरूवात मुळे दौंड परिसरातील स्वामीभक्तांना अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणे अधिक सोयीचे झाले असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!