Homeराजकीयस्थापना दिनी भाजपचा जनसंपर्क व दौंड शहरातील समस्यांवर थेट मुख्याधिकाऱ्यांशी संवाद; शहर...

स्थापना दिनी भाजपचा जनसंपर्क व दौंड शहरातील समस्यांवर थेट मुख्याधिकाऱ्यांशी संवाद; शहर विकासाला गती देण्याचा भाजपचा निर्धार

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आमदार राहुल कुल, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे आणि दौंड शहर अध्यक्ष रितेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृहे, पार्किंगची कमतरता, ड्रेनेज व्यवस्था आणि वाढती पाणीटंचाई यांसारख्या महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. राजेंद्र ओझा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दौंड शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या.

बैठकीदरम्यान मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महत्त्वाची माहिती दिली. शहरासाठी १३ नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहांना मंजुरी मिळाली असून कामांना सुरुवात झाली आहे. दोन उद्यानांच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध झाला असून ती कामेही गतीने पूर्ण केली जातील. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी नियोजन सुरू असून ड्रेनेजची कामे आधीच सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे काम प्रगतिपथावर असून लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्याने उभारण्यात आलेल्या बस पिकअप शेड येथे बोरवेलद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचीही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनलाल भंडारी, बालाप्रसाद मंत्री, राहुल भंडारी, नागेश बेलुरकर, तन्मय पवार, प्रकाश पारदासनी, विश्वजीत सोनवणे, यश कुलथे, प्रशांत कांबळे, तम्मा पालिम, जाधव काका आदींसह महिला आघाडीच्या मीना जाधव, मोनाली वीर, सरिता कुल आणि सीमा शेंडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार अधिक जोमाने करण्याचा निर्धार केला. मोनाली वीर यांनी आभार प्रदर्शन केले, तर मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!