Homeसामाजिकसावित्रीबाई फुले–मुक्ता साळवे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; समतेचा संदेश देणारा प्रेरणादायी...

सावित्रीबाई फुले–मुक्ता साळवे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; समतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम

वृत्तवेध मarathi /संदिप बारटक्के

दौंड — क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व सत्यशोधक मुक्ता साळवे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सकल मातंग समाज, दौंड शहर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांना प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमप्रसंगी दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे पाटील तसेच प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला निलेश सावंत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निखिल स्वामी, सामाजिक कार्यकर्ते उमेश जगदाळे, पत्रकार अमित कदम यांच्यासह मातंग समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने समाजबांधव-भगिनी उपस्थित होते.
यावेळी विशेष उपस्थिती लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नितीन तुपसौंदर्य, लहुजी शक्ती सेनेचे नेते अमित मोरे, मातंग समाजाचे युवा नेते मोहन कांबळे, लहुजी स्तंभ प्रमुख सागर गुंडके, दत्तू घोडे, सोमनाथ आगलावे, साहिल खंडाळे, धीरज दिवटे, शुभम तुपसौंदर्य, अभि मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे पाटील यांनी मातंग समाजातील सर्व प्रलंबित प्रश्न व विकासकामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दौंड नगरपालिका सदैव सहकार्य करेल, असे त्यांनी नमूद केले.
समाजाच्या विनंतीला मान देत नगराध्यक्ष व नगरसेविकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिल्याबद्दल सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!