Homeसामाजिकसाप्ताहिक ‘वादळी स्वातंत्र्य’च्या वतीने ५० मान्यवरांना ‘वादळी सन्मान’ १३ सप्टेंबरला श्रीगोंदा नगरपरिषद...

साप्ताहिक ‘वादळी स्वातंत्र्य’च्या वतीने ५० मान्यवरांना ‘वादळी सन्मान’ १३ सप्टेंबरला श्रीगोंदा नगरपरिषद सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा; विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा होणार गौरव…

संदिप बारटक्के

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले साप्ताहिक ‘वादळी स्वातंत्र्य’ च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रदान करण्यात येणाऱ्या ‘वादळी सन्मान पुरस्कारांची’ नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, १३ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा नगरपरिषद सभागृह, पंतनगर येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रांतील तब्बल ५० पुरस्कारार्थींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती ‘वादळी स्वातंत्र्य’चे संपादक जितेंद्र पितळे यांनी दिली.

मागील १३ वर्षांपासून ‘वादळी स्वातंत्र्य’च्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला जात आहे. समाजासाठी सकारात्मक व प्रेरणादायी काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळावी, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये सामाजिक, पत्रकारिता, कृषी, राजकीय, आध्यात्मिक, जाहिरात, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग, प्रशासकीय आणि विधी अशा विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

विधी क्षेत्रात एडवोकेट वैष्णवी काकडे, एडवोकेट स्वाती आचार्य आणि एडवोकेट किशोर वाळुंज यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रशासकीय क्षेत्रात सेंट्रल बँक, अहिल्यानगरच्या वरिष्ठ व्यवस्थापक उषा सुपनर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीगोंदा उपविभागाचे बहिर्जी शिंदे तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेचे हरिश्चंद्र उर्फ मधू दांडेकर यांना गौरविण्यात येणार आहे.

उद्योग क्षेत्रात कुतवळ फूड्सचे चेअरमन प्रकाशशेठ कुतवळ, लोणी व्यंकनाथ येथील उद्योजक अजित काकडे आणि श्रीगोंदा येथील पुणेरी वडापावच्या विजयाताई लंके यांचा समावेश आहे.

वैद्यकीय क्षेत्रात दौंड येथील खवटे हॉस्पिटलचे डॉ. किरण खवटे, आनंद ऋषीजी हॉस्पिटल, अहिल्यानगरचे डॉ. राहुल अग्रवाल, सिद्धिविनायक नेत्रालय, काष्टी येथील डॉ. तेजस्विनी जयनेंद्र राहुड आणि अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलचे डॉ. गणेश मैड यांचा सन्मान होणार आहे. तसेच श्रीगोंदा फॅक्टरी येथील न्यूज पेपर एजंट सागर मोकाशी यांना ‘वादळी सन्मान विशेष सेवा गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

११ शिक्षकांचा विशेष गौरव
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रातील ११ शिक्षक-शिक्षिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये मनीषा गायकवाड, जयश्री हराळ, वनिता जगताप, सुवर्णा काळे निंभोरे, संतोष इंगवले, सुवर्णा विठ्ठल वागस्कर, दिलीप पालवे, रमेश सुपेकर, संदीप रासकर, ईश्वर मोरे आणि प्रा. बाबुराव कांबळे यांचा समावेश आहे.

जाहिरात क्षेत्रात डॉ. अक्षयजी शेलार तसेच नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन-व्हाईस चेअरमन यांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

आध्यात्मिक क्षेत्रात पारनेर येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी साधना दीदी यांना गौरविण्यात येणार आहे.

राजकीय क्षेत्रातील पुरस्कारार्थींमध्ये श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील, दौंड नगरपरिषदेचे गटनेते योगेश प्रेमसुखजी कटारिया, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय हिरणावळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामराव नागवडे यांचा समावेश आहे.

कृषी क्षेत्रात म्हातारपिंपरी येथील नितीन वाबळे पाटील, वांगदरी येथील निलेश नागवडे आणि लोणी व्यंकनाथ येथील भाऊसाहेब उर्फ संदीप डांगे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रात श्रीगोंदा येथील श्रीरंग साळवे, आढळगाव येथील जावेद इनामदार, दौंड येथील संदिप बारटक्के आणि श्रीगोंदा येथील राम सोनवणे यांना ‘वादळी सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.

तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केशवभाऊ मगर, डॉ. महेंद्र मुनोत, बुवा सावंत, विलास अण्णा वाघमारे, दादासाहेब जंगले आणि रामशेठ दावरा यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यासाठी ‘वादळी स्वातंत्र्य’च्या संपादकीय व कार्यकारी मंडळातील बालाप्रसाद मंत्री,अजित पटवा, गणेश शेंडगे, आदिनाथ पाचपुते, अनंता पवार, संतोष जठार, संतोष सुर्वे, महावीर पोखरणा, शिवाजी साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!