वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भीम आर्मी भारत एकता मिशन यांच्या वतीने भीमनगर येथील शंकरराव सोनवणे सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे २५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये नागरिकांची ब्लड प्रेशर (बीपी), रक्तातील साखर (शुगर), ईसीजी आणि रक्तगट तपासणी मोफत करण्यात आली. तसेच पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक इंद्रजीत जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा छाया दीपक थोरात, नगरसेविका स्वाती निलेश सावंत, प्रणिता अक्षय जठार (शिंदे), नगरसेवक जीवराज पवार, सागर जगताप, मंगेश चलवादी, रुपेश जाधव, डॉ. महेंद्र जगदाळे, आरपीआय नेते सतीश थोरात, माजी नगरसेवक उत्तम सोनवणे, जालिंदर सोनवणे, प्रमोद राणेरजपूत, निखिल स्वामी, अमित कदम, अभिजित शिंदे, श्रीकांत थोरात, सचिन कुलथे, राजेश मंथने, सुरेश येरमाळे आणि किरण खडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनचे दौंड तालुका अध्यक्ष किरण शिंदे, दौंड शहराध्यक्ष सुनील पाटोळे, शहर उपाध्यक्ष अजय सोनवणे, शहर खजिनदार अक्षय जगताप, शहर सचिव अमित शिंदे, शहर उपसचिव प्रशांत शिंदे, शहर कार्याध्यक्ष अमित सोनवणे, शहर उपकार्याध्यक्ष किरण सोनवणे, शहर संघटक अंबादास लांडगे,तालुका संघटक संदिप सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष तुषार चंदनशिवे आणि तालुका सचिव विनोद शिवभारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























