Homeसामाजिकबालपणीच दृष्टीदोष ओळखण्यासाठी डॉ.भट्टड यांचा पुढाकार; मोफत नेत्र तपासणी शिबिरात ७५ विद्यार्थ्यांची...

बालपणीच दृष्टीदोष ओळखण्यासाठी डॉ.भट्टड यांचा पुढाकार; मोफत नेत्र तपासणी शिबिरात ७५ विद्यार्थ्यांची तपासणी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरातील भट्टड हॉस्पिटल आणि मॅगो इंटरनॅशनल प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १० वयोगटातील मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ७५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३० मुलांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. चिराग भट्टड यांनी दिली.

यावेळी बोलताना डॉ. चिराग भट्टड म्हणाले, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. बालपणीच डोळ्यांशी संबंधित समस्या ओळखल्यास त्यावर योग्य वेळी उपचार करता येतात. मुलांच्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करताना त्यांच्या दृष्टीची कार्यक्षमता तपासणे गरजेचे आहे. याच उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरादरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये रेटिनासंबंधी तपासणीची आवश्यकता आढळून आली. अशा विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी वेळ देण्यात आली असून त्यांची मोफत तपासणी भट्टड हॉस्पिटल, दौंड येथे करण्यात येणार आहे.

मॅगो इंटरनॅशनल प्री स्कूलचे प्रमुख राहुल पुरोहित आणि विकी धामणे यांनी सांगितले की, सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज आहे का, याची माहिती पालकांना वेळेवर मिळावी आणि भविष्यातील त्रास टाळता यावा, या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. पालकांच्या सहकार्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेताना…

दौंड येथील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक कार्य, नेत्रदान जनजागृती, मोफत नेत्र तपासणी शिबिरे तसेच पंढरपूर वारीतील वारकऱ्यांची मोफत तपासणी यांसारख्या उपक्रमांतून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या सेवाभावी परंपरेचा वारसा डॉ. चिराग भट्टड समर्थपणे पुढे नेत असून समाजातील विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!