Homeताज्या बातम्यापावसाळ्यापूर्वी नगराध्यक्षांची शहरातील गटारी व नालेसफाई कामांची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी नगराध्यक्षांची शहरातील गटारी व नालेसफाई कामांची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या तातडीच्या सूचना

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, ड्रेनेज तुंबणे तसेच नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी शहरातील प्रमुख गटारी, नाले व ड्रेनेज लाईनची प्रत्यक्ष पाहणी केली.

दौंड शहरातील विविध भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या व जलनिस्सारण व्यवस्थेच्या समस्या उद्भवत असल्याने अशा संवेदनशील ठिकाणांची यावेळी विशेष तपासणी करण्यात आली. पाहणीदरम्यान गटारी व नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा तसेच अडथळे दूर करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गटारीतील गाळ तातडीने काढण्याच्या, नालेसफाईची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वच्छता व जलनिस्सारण व्यवस्थेची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांनी प्रशासनाला शहराच्या स्वच्छतेला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

या पाहणीमुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील स्वच्छता व जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांना अधिक गती मिळणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!