Homeराजकीय“नगरसेविका नाही, सेविका म्हणून काम करणार” – स्वाती सावंतांचा ठाम निर्धार दिलेलं...

“नगरसेविका नाही, सेविका म्हणून काम करणार” – स्वाती सावंतांचा ठाम निर्धार दिलेलं वचन पूर्ण करणार! स्वाती सावंतांचा प्रभाग विकासाचा संकल्प

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड – नागरिकांना सेवा देणे हे आपले प्रथम कर्तव्य राहिल. प्रभाग क्रमांक सहा मधील स्वच्छता व आरोग्य सुधारण्यासाठी तसेच नागरिकांपर्यंत सेवा सुविधा पोहोचवणं हाच प्राथमिक उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या दौंड नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी, “मी नगरसेविका म्हणून नव्हे तर सेविका म्हणून काम करणार आहे,” असे ठाम मत व्यक्त केले. निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील मतदारांना दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विरधवल बाबा जगदाळे तसेच माजी नगराध्यक्ष दत्तात्रय सावंत यांच्या विचारांना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देत प्रभाग क्रमांक सहा आदर्श बनवण्याचा संकल्प नगरसेविका स्वाती सावंत यांनी यावेळी जाहीर केला.

यावेळी नगरसेविका स्वाती निलेश सावंत म्हणाले की, मी निवडणुकीत दिलेलं वचन म्हणजे फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम करणारच,,,

‌ १. भीम नगर येथील कालकथीत शंकरराव सोनवणे सभागृह पूर्णपणे अद्ययावत करणार.

२. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानाचं अपूर्ण काम प्राधान्याने पूर्ण करणार.

३. डॉ अण्णाभाऊ साठे नगरात चावडी आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची तालीम उभी करणार

४. भीम नगर, डॉ अण्णाभाऊ साठे नगर आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक ६ मधील प्रत्येक पात्र कुटुंबाला घरकुल योजनेत घर मिळवून देणार.

५) संत रोहिदास महाराज नगरमधील समाजमंदिर बांधणार या सर्व कामासाठी मी १०० टक्के प्रयत्न करणार

६. डॉ अण्णाभाऊ साठे नगरातील जुन्या घरांची सिटी सर्व्हेत नोंद होण्यसाठी प्रयत्न करणार‌.

माझ्या प्रभागातील सर्व समाजातील बेरोजगार तरुण-तरुणींना व महिलांना रोजगार हमी देणार मुला-मुलींना उत्तम शिक्षण, शिष्यवृत्ती, कोचिंग – मी स्वतः पाठपुरावा करणार

रात्री १२-२ वाजता येणारं पाणी दिवसा येईल, यासाठी पाठपुरावा करून दिवसा पाणी येईल याची काळजी घेणार

प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणार

आणि हो…

आपला प्रभाग सुसंस्कृत, सुशिक्षित आणि पूर्णपणे सुरक्षित ठेवणार ! मुली रात्री १२ वाजता निर्भयपणे फिरतील, रस्त्यावर सीसीटीव्ही, पुरेशी दिवे, पोलिस पेट्रोलिंग – सर्व करून आपला प्रभाग सुरक्षिततेचं मॉडेल बनेल ! यासाठी मला उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित दादा पवार, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, दौंड शुगर संचालक श्री वीरधवल बाबा जगदाळे यांचे सहकार्य मोलाचे राहील.

प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मतदान रुपी आशिर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे,तसेच नव्या जबाबदारीतून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल.

    – सौ स्वाती निलेश सावंत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!