Homeमहत्त्वाचेदौंड शहरामध्ये मोकाट जनावरांच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा? गोवंश विक्रीचा गंभीर संशय; चौकशीची...

दौंड शहरामध्ये मोकाट जनावरांच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा? गोवंश विक्रीचा गंभीर संशय; चौकशीची मागणी

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के

दौंड : दौंड नगरपरिषदेच्या हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून त्यांच्या सुरक्षित संगोपनासाठी काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी अक्षय रमेश वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड नगरपरिषदेमार्फत किरण डिस्ट्रीब्यूटर या एजन्सीस 29 सप्टेंबर 2025 रोजी कार्यादेश देण्यात आला होता. या अंतर्गत शहरातील मोकाट जनावरे (गाय, बैल इ.) पकडून त्यांचे सुरक्षित संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीवर सोपविण्यात आली होती. सदर एजन्सीने पकडलेले गोवंश श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट, धायगुडेवाडी (बोरीपार्धी, चौफुला) येथे ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

मात्र, तक्रारीनुसार काही कालावधीनंतर संबंधित एजन्सीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गोवंश इतर ठिकाणी हलविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, शिवशंभी गौशाळा ट्रस्ट, पुणे येथे जनावरे पाठविण्यात आल्याचा उल्लेख असून ही गोशाळा सध्या कार्यरत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

याबाबत 12 एप्रिल 2026 रोजी संबंधित गोशाळेशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ 37 गोवंश ताब्यात घेतल्याचे सांगितले. उर्वरित जनावरे इतरत्र दिल्याचेही त्यांनी कबूल केल्याने या प्रकरणात संशय अधिकच गडद झाला आहे.

तक्रारदाराने पुढे म्हटले आहे की, एजन्सीकडून सादर करण्यात आलेली बिले, गोशाळांचे दाखले व प्रत्यक्ष गोवंश संख्या यामध्ये मोठी तफावत आढळते. तसेच, नगरपरिषदेच्या अकाउंट विभागाकडे सादर केलेल्या आकडेवारीतही विसंगती दिसून येते. यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर पकडलेले गोवंश चार महिन्यांनंतर मूळ मालकांना परत दिल्याचे खोटे दाखले तयार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, काही गोवंश कत्तलीसाठी विक्री केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून यामुळे पशुसंवर्धन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे.

या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे काम स्थगित करावे, बिले थांबवावीत आणि दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे दौंड शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!