वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भिम वॉरियर्स यांच्या वतीने ‘भव्य भिम फेस्टिवल २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आले होते.
दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या भिमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे आमदार ऍड. राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते झाले. यावेळी RPI पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे पाटील, दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा छाया थोरात, गटनेते योगेश कटारिया, नगरसेवक मंगेश चलवादी, जेष्ठ नेते नागसेन धेंडे, नगरसेवक वसीम शेख, अथर्व सरनोत, शौकत सय्यद, सागर जगताप, रोहित पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजय राऊत, युवा उद्योजक ऋषिकेश थोरात, अमोल जगताप, सचिन खरात, माजी नगरसेवक अनिल साळवे, आनंद बगाडे, अक्षय शिखरे, ऍड. अनिकेत मिसाळ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शालिमार चौक येथे नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे व समस्त भिमकन्या ग्रुप यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.
तसेच दि. १६ एप्रिल २०२६ रोजी म्हसनेरवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बेंच वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम युवा उद्योजक संदीप साळवे यांच्या हस्ते पार पडला.
या संपूर्ण फेस्टिवलचे आयोजन भिम वॉरियर्स चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राणेरजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितू शिदगणे, सागर मैराळ, अतुल सिद्धगणेश, अमित थोरात, विनोद सातपुते, आकाश पट्टेकर, संजय बनसोडे, नितीन बनसोडे, गणेश यादव, विशाल चंद्रमोरे, आशिष उबाळे, ओंकार सातपुते, आभी सिदगणे, गणेश माने आदींनी परिश्रम घेतले.
या भव्य फेस्टिवलमुळे दौंड शहरात सामाजिक ऐक्य, प्रबोधन आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























