Homeराजकीयदौंड शहरात स्वच्छता अभियानावरून राजकीय वातावरण तापले; "आम्हाला विश्वासात घेतले नाही "...

दौंड शहरात स्वच्छता अभियानावरून राजकीय वातावरण तापले; “आम्हाला विश्वासात घेतले नाही ” म्हणत नगरसेवक, नगरसेविका आक्रमक

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्याच्या अनुषंगाने दौंड नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या नियोजनावरून नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. नगरसेवकांना विश्वासात न घेता तसेच आरोग्य सभापतींना पूर्वकल्पना न देता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नगरसेविका तथा आरोग्य सभापती कार्तिकी अनिल सोनवणे यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शहरातील सर्व प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक संस्था व नागरिकांना सहभागी करून व्यापक नियोजन करण्याऐवजी प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक ११ मधील शिवाईदेवी मंदिर (शिवराजनगर) परिसरातून करण्याचे ठरविले.

निवेदनात प्रशासनावर नेहमीप्रमाणे प्रभाग क्रमांक ११ ला प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील दुर्लक्षित व झोपडपट्टी भागांमधून स्वच्छता अभियानाची सुरुवात करणे आवश्यक असताना मनमानी पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

तसेच कार्यक्रमाबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, निमंत्रण पत्रिका वेळेत पोहोचविण्यात आल्या नाहीत आणि आरोग्य सभापतींसह लोकप्रतिनिधींना पूर्णपणे डावलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रशासनाची ही भूमिका पक्षपाती व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नगरसेवक, नगरसेविका व आरोग्य सभापती यांनी या संपूर्ण प्रकाराचा निषेध नोंदवत कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधितांवर कारवाई न झाल्यास सर्व नगरसेवक, नगरसेविका व आरोग्य सभापती लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

नागरिक हित संरक्षण मंडळाच्या सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे दौंड शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!