Homeशहरदौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा जल्लोषात; मल्लखांबाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी मिरवणूक...

दौंड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा जल्लोषात; मल्लखांबाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी मिरवणूक ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | शहरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी शिवजयंती मिरवणुकीत पहिल्यांदाच मल्लखांबाच्या धाडसी प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आल्याने ती दौंडकरांसाठी विशेष आकर्षण ठरले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत शिवकालीन ऐतिहासिक जिवंत देखावे, मर्दानी खेळ, ढोल-ताशे, लेझीम पथके यांचा भव्य समावेश होता. मिरवणुकीच्या रथावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती विराजमान होती, तर इतर रथांवर शिवकालीन आणि धार्मिक देखावे सादर करण्यात आले होते. भगव्या ध्वजांनी सजलेला परिसर, पोवाड्यांचे सूर आणि “जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बंडू लांबडे, शिवभक्त आप्पासाहेब पवार आणि प्रवीण परदेशी यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. मिरवणुकीत इतिहासकालीन वेशभूषा केलेली पात्रे घोड्यावर स्वार होत नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

दौंड शहरातील जामा मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी सरबत वाटप करून शिवभक्तांचे स्वागत केले, ज्यामुळे सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. मिरवणुकीनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळी हिंदू व्यायाम संघ व भगवे वादळ ग्रुप यांच्या शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कदम यांच्या स्मरणार्थ सरबत वाटपाचा कार्यक्रमही पार पडला.

यावेळी सातारा येथील महाराजा सयाजीराव विद्यालय मल्लखांब मंडळाच्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी मिरवणुकीत आपल्या कौशल्याचे अप्रतिम दर्शन घडवले. रणवीर मोहिते, आयुष शिंदे, आयुष काळंगे, सिद्धेश कुंभार, मंथन माने, वैष्णवी पवार, तन्वी शिवशरण, रिद्धी वेलणकर, रुद्राणी भोसले, सई घनवट, सायली लोखंडे आणि सृष्टी चव्हाण यांनी सूर्यनमस्कार, योगासने तसेच दोरी मल्लखांबासह विविध धाडसी प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या या सादरीकरणाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एकूणच, विविध उपक्रमांनी सजलेली ही भव्य मिरवणूक दौंड शहरात शिवजयंतीचा उत्सव अधिक रंगतदार ठरवत गेली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!