Homeराजकीयदौंड शहरातील विकासकामांना गती; २ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर

दौंड शहरातील विकासकामांना गती; २ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के

दौंड — शहरातील विविध विकासकामांसाठी तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शहरातील अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरण व पावसाळी गटारांच्या कामांना यामुळे मोठी चालना मिळणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १ कोटी ९४ लाख ७४ हजार ९१ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच गाववेस परिसरातील काँक्रिटीकरण व पेवर ब्लॉक बसविण्यासाठी ४१ लाख रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या खासदार कार्यकाळातील खासदार निधीतून मंजूर करण्यात आला आहे.

या विकासकामांसाठी नगरसेवक इंद्रजित जगदाळे, मंगेश चलवादी, रूपेश जाधव तसेच नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी देखील निधीसाठी विशेष प्रयत्न केले होते.

मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये प्रभाग क्रमांक ६ मधील साठेनगर येथे विविध ठिकाणी काँक्रिटीकरण व पावसाळी गटारांसाठी १ कोटी ५२ हजार ८०० रुपये मंजूर झाले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील तुकाईनगर येथे काँक्रिटीकरण व पावसाळी गटारांसाठी ३७ लाख ९९ हजार २९० रुपये आणि डांबरीकरण व पावसाळी गटारांसाठी ५६ लाख २२ हजार ४ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सदर कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. या विकासकामांमुळे अनेक भागांतील अंतर्गत रस्ते व पावसाळी गटारांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांनी सांगितले की, “दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या माध्यमातून भविष्यातही अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. विकासकामांचा दर्जा चांगला राहण्यासाठी नागरिकांनीही कामांवर लक्ष ठेवावे.”

यावेळी त्यांनी घरपट्टी व नळपटी वसुलीसाठी सहकार्य करणाऱ्या दौंडकर नागरिकांचे आभारही मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!